जिल्हा
परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2017 अंतर्गत
बँक खाते उघडण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 31 :- जिल्हा
परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2017 चा निवडणूक कार्यक्रम दि. 02 जानेवारी,
2017 रोजी जाहिर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी
व खर्चावर नियंत्रणे ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या
वस्तुच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी हिंगोली यांचे अध्यक्षतेखाली सनियंत्रण
समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संभावित उमेदवार आपल्या बँक शाखेकडे
निवडणूक खर्चासाठी, विशेष बचत खाते / चालु खाते उघडण्यासाठी येतील, अशा सर्व संबंधित
व्यक्तिंचे बँक खाते त्वरित उघडून देणे आवश्यक आहे.
तरी आपण या कामी व्यक्तिश: लक्ष घालुन निवडणूक उमेदवार
/ संभावित उमेदवार याची खाती त्वरित उघडून देण्याची व्यवस्था करावी. या कामी दिरंगाई
करणारे कर्मचारी / अधिकारी हे अनुशासनात्मक कार्यवाहीस पात्र राहतील, याची नोंद घ्यावी.
*****
No comments:
Post a Comment