जिल्ह्यातील
35 गावासाठी नवीन विंधन विहिरीच्या प्रस्तावास मान्यता
हिंगोली,
दि. 19 : पाणी टंचाई अंतर्गत हिंगोली तालूक्यासाठी 23 तर कळमनूरी तालूक्यासाठी 12 अशा
एकूण 35 गावाकरीता नवीन विंधन विहिरींच्या
प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील 1) भिंगी
2) देवठाणा 3) कानडखेडा खु. 4) पिंपळदरी त. बासंबा 5) सावरगाव बंगला 6) कलगांव 7) नवलगव्हाण
8) जामठी खु. 9) चोरजवळा 10) हिरडी 11) कोथळज 12) लिंबी 13) लोहरा 14) जोडतळा 15) टाकळी
त. नांदापूर 16) तिखाडी 17) समगा 18) राजुरा 19) पेडगांव 20) सायाळा 21) ईडोळी 22)
येळी आणि 23) सावा कळमनुरी तालुक्यातील 1) असोलवाडी 2) जटाळवाडी 3) कोंढूर 4) सोडेगाव
5) बोथी 6) असोला 7) रेडगाव 8) फुटाना 9) उमरदरावाडी 10) मोरवड 11) कळमकोंडा खु. आणि
12) गांगापूर अशा एकुण 35 गावांसाठी 35 नवीन
विंधन विहिरी व हातपंपाचे कामाचे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रत्येकी 49 हजार 605 याप्रमाणे
17 लाख 36 हजार 175 रुपये निधीच्या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता प्रदान केली
आहे. सदरील 35 गावांमध्ये जर यापुर्वी विंधन विहीरी घेण्यात आल्या असतील तर प्रामुख्याने
त्याची दुरूस्ती शक्य असेल तर दुरूस्त करावे या अटीस अधिन राहून या प्रशासकीय मान्यता
देण्यात आल्या आहेत.
*****
No comments:
Post a Comment