‘दहशतवाद
व हिंसाचार विरोधी दिवस’
21 मे ऐवजी 20 मे रोजी होणार साजरा
हिंगोली, दि.
19 : ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ रविवार दि.
21 मे 2017 रोजी साजरा करण्यात येतो. परंतू रविवार दि. 21 मे 2017 रोजी राज्यातील
शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सार्वजनीक सुट्टी असल्यामुळे शनिवार दि. 20 मे
2017 रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेऊन ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी
दिवस’ साजरा करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकान्वये दिल्या
आहेत.
जिल्ह्यातील सर्व विभाग
प्रमुखांनी याबाबत दि. 16 मे, 2017 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये योग्य ती
कार्यवाही करावी व शनिवार दि. 20 मे, 2017 रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’
साजरा करावा, असे जिल्हाधिकारी हिंगोली यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले
आहे.
*****
No comments:
Post a Comment