शेतकऱ्याला शाश्वत
वीज देणार : ऊर्जामंत्री बावनकुळे
३३ केव्हीच्या दहा
उपकेंद्राचे हिंगोलीत भूमीपूजन
हिंगोली दि.17: शेतकऱ्याची प्रगती आणि आर्थिक उन्नती वीज असेल तरच होईल. यासाठीच
हिंगोली जिल्हयाला आतापर्यंत २९८ कोटी दिले व आणखीन १७५ कोटी देवून मोठी कामे करण्यात
येतील. एकूण ४७५ कोटी रूपयांची विजेची कामे या जिल्हयात करून शेतकऱ्याला व ग्राहकांना
शाश्वत वीज देणार असे आश्वासन ऊर्जामंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.
हिंगोली जिल्हाअंतर्गत 33 के.व्ही.च्या 10 उपकेंद्रांचे भूमिपूजन प्रसंगीत
बोलत होते. याप्रसंगी आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खासदार
शिवाजीराव माने, प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता आविनाश पाटोळे, अधीक्षक
अभियंता बाबसाहेब जाधव व अन्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मनुष्याच्या शरीरातीन
रक्तवाहिनीइतके महत्व विजेला आहे.एक दिवस वीज बंद झाली तर तीन दिवसांचे नुकसान होते.
सरकार बदलले आहे . आता शेतक-याला कबुल केली तेवढी वीज देण्यास सरकार बांधिल आहे. नविन
10 उपकेंदांमुळे परिस्थितीत आणखी सुधारणा होणार आहे. हिंगोली तालूक्यातील खाकीबाबा
मठ,समगा, कळमनुरी तालूक्यातील लमानदेव, मसोड तसेच सेनगाव तालूक्यातील जयपूर, जवळा बु.,
औंढा नागनाथ येथील रूपूर तांडा तर वसमत तालूक्यातील सेलू,पाडी खुर्द आणि पळशी या ठिकाणच्या
उपकेंद्रामुळे हजारो वीजग्राहकांना अखंडीत आणि योग्यदाबाचा वीजपुरवठा मिळण्यास मदत
होणार आहे असेही ऊर्जामंत्र्यानी स्पष्ट केले.
महावितरणच्या कर्मचारी/अभियंत्यांनी
ग्राहकांच्या तक्रारी येणार नाही असे काम करावे. चांगले काय करणा-यांच्या पाठीशी सरकार
उभे आहे, पण कामचुकारांना शिक्षा झाला शिवाय राहणार नाही, असेही त म्हणाले. मुख्यमंत्री
सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत हिंगोली येथे 4 प्रकल्प देण्यात येणार असल्याचे सांगताना
ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, यामुळे शेतक-यांना 12 तास दिवसा वीज मिळणार आहेृ
शेतक-यांची पडित जमीन भाडयाने घेऊन त्यावर हे प्रकल्प उभे राहतीलृ विदर्भ-मराठवाडयातील
325 दिवस मिळणा-या उन्हाचा उपयोग करुन हा प्रकल्प साकारणार आहेृ असे सांगताना ऊर्जामंत्री
म्हणाले, शेतक-यांना वीज दयावीच लागणार त्याशिवाय हा महाराष्ट्र समध्द होणार नाही शेतक-यांनी
त्यांच्याकडे असलेली विजेची थकबाकी भरावी व त्या निधीतून आपल्या भागातील वीज पुरवठयाची
कामे करावी शेतक-यांकडील थकबाकीतून दंड व्याज बाजूला ठेवून मूळ रक्कमेचे हस्ते करुन
देण्यास तयार आहोत टप्याटप्याने शेतक-यांनी बिल भरावे असे कळकळीचे आवाहनही ऊर्जामंत्र्यांनी
केले.
****
No comments:
Post a Comment