स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे
आयोजन
हिंगोली, दि. 8 : महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय
परिसर हिंगोलीव्दारे या कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक
हिंगोली येथे सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती करिता स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम
हिंगोली येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा कालावधी 12 दिवसांचा सशुल्क
असून प्रशिक्षण दि. 15 मे, 2017 ते दि. 27 मे, 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
सदर
कार्यक्रमात शेळी पालन, म्हैसपालन इत्यादी विषयी या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार
आहे सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची
कार्यप्रणाली, प्रकल्प अहवाल इ. बाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार
आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात ज्या बेरोजगार युवक युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास
वयोमर्यादा 18 ते 45, शिक्षण 7 वी पास, प्रवेशाची अंतिम तारीख 12 मे, 2017 च्या दुपारी
4.00 वाजेपर्यंत श्री. समाधान मोरे कार्यक्रम आयोजक मो. 9158272909 एमसीईडी जिल्हा
कार्यालय व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला, हिंगोली
येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास
केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment