09 May, 2017

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 9 : राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरण ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे  दिनांक 17 मे, 2017 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 17 मे, 2017 रोजी सकाळी 8.00 वाजता नागपूर येथुन हेलीकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता डीडीयुजीजेवाय योजने अंतर्गत मंजुर 33/11 के.व्ही. उपकेंद्र समगा ता. हिंगोली, जयपूरजवळा, ता. सेनगांव, रुपुरतांडा ता. औंढा, माझोड ता. कळमनुरी, पळशी, पारडी, सेलू ता. वसमत व आयपीडीएस योजने अंतर्गत खाकीबाबा मठ ता. हिंगोली, लमानदेव ता. कळमनुरी येथील मंजूर विद्युत उपकेंद्राचे अधिक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, हिंगोलीतील प्रांगणात भूमीपूजन.
दुपारी 10.00 ते दु. 1.00 वाजता जनतेच्या तक्रारी स्वीकारुन निवारणास्तव राखीव वेळ. ( सर्वपक्षीय पदाधिकारी व जनता यांचेकडून तक्रारी, निवेदने, सुचना स्वीकारणे व त्याचे निवारण करणे) (महावितरण/महापारेषण कंपनींचे कनिष्ठ अभियंता ते वरीष्ठस्तर अधिकारी, राज्य ऊत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक ते वरीष्ठस्तर अधिकारी, महाऊर्जाचे अधिकारी व विद्युत निरीक्षक उपस्थित राहतील. स्थळ : अधिक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, हिंगोलीचे प्रांगण) दुपारी 1.00 ते 2.00 वाजता राखीव. दुपारी 2.00 ते दुपारी 4.00 वाजता लोकप्रतिनिधी समवेत बैठक ( मा. खासदार, मा. आमदार, मा. जि. प. अध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापती पं. स., जि. प. पदाधिकारी इत्यादी सोबत बैठक व चर्चा) ( महावितरण/महापारेषण कंपनींचे कार्यकारी अभियंता ते वरीष्ठस्तर अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक ते वरीष्ठस्तर अधिकारी, महाऊर्जाचे अधिकारी व विद्युत निरीक्षक उपस्थित राहतील. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृह) दुपारी 4.00 ते 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात पत्रकार परिषद. दुपारी 4.30 वाजता शिरपूर खंडाळा ता. मालेगाव जि. वाशिमकडे हेलिकॉप्टरने प्रयाण.

                                                                           ***** 

No comments: