09 May, 2017

क्रीडा सुविधाच्या आर्थिक सहाय्यकरिता अर्ज करण्याचे आवाहन  
हिंगोली, दि. 9 : क्रीडा विभागाच्या नवीन शासन निर्णयानुसार क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत अनुदानित शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे,  प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, यामध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करणे त्यामुळे खेळाडूंच्या कामगीरीत वाढ होऊन आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यास मदत होईल. त्यामध्ये खाजगी/शासनाच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या व राज्य शासनाच्या संबंधित विभागाने दिलेल्या मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, कृषी  महाविद्यालय, तंत्रशिक्षण व वैद्यकिय महाविद्यालय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक / माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय, तसेच विविध खेळाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या व सार्वजनिक विश्वस्त अधनियम 1950 किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860 पंजीबद्ध असतील अशा व्यायाम शाळा, क्रीडा मंडळे, एकविध खेळाच्या क्रीडा संघटना, युवा मंडळे व महिला मंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगर पालिका, जिल्हा परिषद व आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा इ. अनुदान प्राप्तीसाठी अर्ज करु शकतील.
सदर विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून दि. 20 मे, 2017 पर्यंत दाखल करणे बंधनकारक राहील. उशीरा आलेले व अपुर्ण प्रस्ताव स्विकारले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  नरेंद्र पवार यांनी केले आहे.

***** 

No comments: