ट्रान्सफॉर्मर-वीज खांबांची ने-आण शेतकरी करणार नाही :
ऊर्जामंत्री हिंगोलीत नागरीकांशी थेट संवाद, ऑन स्पॉट तक्रारींचा निपटारा
तक्रारकर्तांच्या चेह-यावर समाधान
हिंगोली, दि. १७:- ऊर्जा मंत्र्यांच्या जनता दरबाराची
प्रशासनाने घेतली धडकी, तर जनतेत आनंद अशी स्थिती येथे पहायला मिळाली.एका
शेतकऱ्याने म्हटले की,मंत्री गावातून गेले की अधिकारी सुटकेचा श्वास घेतात व
पुन्हा पहिल्यासारखे वागायला लागतात. आता बोलतात ते करून दाखवत नाहीत. याउलट एक
शेतकरी म्हणत होता की अधिकाऱ्याकडून आम्हाला त्रास होईल ते आमचे काम करणार नाही
अशी भितीही दिसून येत होतीट्रान्सफॉमर
आणि विजेचे खांब ने-आण करण्याचे काम शेतकऱ्यांचे नाही. त्यासाठी शासनाने निधी दिला
असून शेतकऱ्यांनी डीपींची आणि खांबांची ने-आण करू नये तसेच महावितरणला
अभियंत्यांनी यासाठी वेठीस धरू नये असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी प्रशासनाला दिले.
हिंगोली येथे अधीक्षक अभियंता
यांच्या कार्यालयात आयोजीत
नागरिकांनी थेट संवाद कार्यक्रमात ऊर्जामंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार
तानाजीराव मुटकुळे,नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खासदार शिवाजीराव माने, आमदार
रामराव वडकुते व त्याचबरोबर महावितरणचे विभागीय संचालक संजय ताकसांडे, मुख्य
अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव व अन्य उपस्थित होते. या
संवाद कार्यक्रमात नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर “ऑन स्पॉट” निकाल ऊर्जामंत्री
यांनी दिला. प्रथमच हिंगोलीत असा उपक्रम राबविण्यात आल्याने भर कडक उन्हातही
नागरिकांणी गर्दी केली होती. कंत्राटदार शेतकऱ्याला कामे सांगतांत, अभियंते, फोन
उचलत नाही, वीज कनेक्शन मिळत नाही, ट्रान्सफॉर्मर मिळत नाही अशा साध्या तक्रारी
यावेळी आल्या.
नागरिकांच्या तक्रारीवर ऊर्जामंत्र्यांनी संबंधित विभागाला कनिष्ठ अभियंता,
शाखा अभियंता व कार्यकारी अभियंत्याकडून खुलासा मागवला, हिंगोली स्तरावरील तक्रारी
आठवडाभरात व मोठया तक्रारी १५ दिवस ते महिन्याभरात सोडविण्याचे निर्देश दिले.
तीन हजार लोकसंखेपेक्षा अधिक लोकसंख्याच्या ग्रामपंचायतींची कनिष्ठ
अभियंत्यांनी संपर्क करुन ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे पद भरण्याचे
कारवाई करण्याचे निर्देश दिले. गेल्या अनेक दिवसांनपासुन डीपीची ने-आण शेतकरीच
करतात या कामासाठी जे शेतकरी पैसे देतात त्यांच्याकडे डीपी लवकर लावली जाते अशा
तक्रारी शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केले. या तक्रारीसाठी अनेक
शेतकऱ्यांच्या संतप्त भावना बघायला मिळाल्या.
या थेट संवाद कार्यक्रमात १३६ तक्रारी
प्राप्त झाल्या या सर्व तक्रारी सुटन्यासारख्या आहेत. त्या दृष्टीने कामे पुर्ण
करुन व्हॉट्सअप वर पाठवुन द्याव्यात व त्याच बरोबर ३१ जुलै पर्यंत सुटल्या नाहीत
तर कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता यांना जबाबदार धरण्यात येईल. पुढच्या
दौऱ्यापर्यंत कामे पुर्ण न केल्यास माफी मिळणार नाही. आलेल्या तक्रारारीच्या
अनुषंगाने दक्षता समितीतर्फे चौकशी करण्यात यावी असे निर्देशही ऊर्जामंत्री
बावनकुळे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
****
No comments:
Post a Comment