सन
2018-19 शालेय क्रीडा स्पर्धाकरीता बैठकीचे आयोजन
हिंगोली,दि.21: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
पुणे, शालेय शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यावतीने सन
2018-19 या वर्षाच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धाचे
आयोजन-नियोजनाकरीता तालुका निहाय क्रीडा शिक्षक, केंद्र प्रमुख, 5 ते 8 वर्ग असलेल्या
शाळेतील एक शिक्षक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात
आलेले आहे.
सदर बैठकाचे तालूका निहाय आयेाजन पुढीलप्रमाणे
केले असून यात सेनगाव तालूका बैठक
दि. 25 जूलै, 2018 रोजी दुपारी
12.00 वा. तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगांव येथे आयोजित करण्यात आली आहे. तर औंढा (ना.) तालूका दि. 26 जूलै,
2018 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हा परिषद प्रशाला, शिरडशहापुर, वसमत तालूका
दि. 26 जूलै, 2018 रोजी दुपारी 2.30 वा. बहिर्जीस्मारक विद्यालय, वसमत, हिंगोली तालूका दि. 27 जूलै, 2018 रोजी दुपारी
12.00 वा. जिल्हा परिषद कन्या प्रशाला, हिंगोली आणि कळमनुरी तालूक दि. 27 जूलै, 2018
रोजी दुपारी 3.00 वा. जिल्हा परिषद प्रशाला, हिंगोली येथे बैठकीचे आयेाजन करण्यात आले
आहे.
सदर बैठक शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी
यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून संबंधित तालुक्यातील तालुका क्रीडा संयोजक, सर्व
क्रीडा शिक्षक, केंद्र प्रमुख, 5 ते 8 वर्ग असलेल्या शाळेतील शिक्षक यांना उपस्थित
राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment