04 July, 2018

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्याचे आवाहन


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्याचे आवाहन
          हिंगोली, दि.4: सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात 10 वी आणि 12 वी पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी  इत्यादी अभ्यासक्रमामध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थी/ विद्यार्थीनीना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या शिष्यवृत्ती करीता पात्र असलेल्या विद्यार्थी / विद्यार्थींनींकडून 10 जुलै, 2017 पर्यंत आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज मागविण्यात येत आहेत.
                अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मार्क लिस्ट, पुढील शिक्षणासाठी प्रवेश  घेतल्याचा पुरावा, फोटो, आधार कार्ड इत्यादी कागदपत्र साक्षांकित करुन जोडावे . तसेच अर्ज साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सरकारी रुग्णालयाचे पूर्व बाजूस, दर्गा रोड, रिसाला, दुरध्वनी क्रमांक (02456) 223831, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, हिंगोली यांनी कळविले आहे.
0000

No comments: