आर्थिकदृष्ट्या मागास व मागासवर्गीय मुलींचे
शासकीय वसतिगृहकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु
हिंगोली,दि.02: शासकीय वसतिगृहाचे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत आज्ञावली विकसनाचे (SoftwareDevelopment)
काम प्रगती पथावर असल्याने सन 2018-2019 या वर्षाकरिता हिंगोली येथील
आर्थिकदृष्टया मागास व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह डॉ.जयदिप देशमुख यांची
इमारत, अकोला बायपास, हिंगोली तसेच नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय
वसतिगृह, आदर्श महाविद्यालयाच्या समोर,
हिंगोली येथील रिक्त असलेल्या जागा पात्र मागासवर्गीय
विद्यार्थीनींकडून आवेदन पत्र (अर्ज) मागवून गुणाक्रमे व जातनिहाय आरक्षण तसेच
विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ
महाविद्यालय आणि व्यावसायीक अभ्यासक्रम निहाय दिनांक 16 मे, 1984
व त्यानंतर वेळोवेळी आतापर्यंत निर्गमित झालेल्या प्रचलित शासन निर्णयाच्या अधिन
राहून सन 2017-2018 प्रमाणेच ऑफलाईन (मॅन्युअली) प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्याचे
आदेश मा. सह आयुक्त, (शिक्षण) समाज कल्याण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे परिपत्रक
क्रं.2359 दिनांक 19-06-2018 अन्वये दिले आहे.
त्यानुसार हिंगोली येथील आर्थिकदृष्टया मागास व
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, डॉ. जयदिप देशमुख यांची इमारत, अकोला बायपास,
हिंगोली तसेच नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, आदर्श महाविद्यालयाच्या समोर,
हिंगोली येथे सन 2018-2019 च्या प्रवेशासाठीचे आवेदनपत्र (अर्ज)
विनामुल्य वाटप सुरु असून प्रवेशासाठीचे अर्ज वाटपाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
देण्यात येत आहेत.
आर्थिकदृष्टया
मागास व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे एकूण 36 जागा रिक्त
आहेत. शालेय विद्यार्थीनींसाठी प्रवेश अर्ज. (इयत्ता 8 वी मध्ये
सन 2018-19 मध्ये प्रवेश घेतलेले) विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन (मॅन्युली)
प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि. 15 जून 2018 ते दि. 04 जूलै 2018 करीता सन
2018-2019 च्या रिक्त जागा अनुसूचित जाती-7, अपंग-1 अशा एकूण 8 जागा रिक्त
आहेत.
तसेच
इयत्ता १० वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी
(इयत्ता ११ वी मध्ये सन 2018-19 मध्ये प्रवेश घेतलेले) (कनिष्ठ महाविद्यालय)
(व्यावसायीक अभ्यासक्रम वगळुन) विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी
अर्ज करावयाचा कालावधी दि. 15-06-2018 ते दि. 20-08-2018 असा आहे. सन 2018-2019
च्या रिक्त जागा खासबाब-3 आहेत.
तसेच बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. (सन
2018-2019 मध्ये प्रथम वर्षास प्रवेश) अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश
घेतलेल्या पदवीका/पदवी आणि एम.ए./एम. कॉम./एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर,
पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम. (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळुन) अभ्यासक्रमामध्ये
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा
कालावधी दि. 15-06-2018 ते दि. 24-07-2018 असा असून त्यासाठी सन 2018-2019 च्या
रिक्त जागा अनुसूचित जाती-8, अनाथ-1 अशा एकूण 9 जागा आहेत.
व्यावसायीक अभ्यासक्रम. (प्रमथ वर्षे प्रवेश)
अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा
कालावधी दि. 15-07-2018 ते दि. 28-08-2018 असा असून त्यासाठी सन 2018-2019 च्या
रिक्त जागा अनुसूचित जाती-12, अंपग-1,
अनु. जमाती-1, विजाभज-1, आर्थिकदृष्टया मागास-1,
अशा एकूण 16 जागा एवढ्या आहेत.
तसेच डॉ. बा. आं. यांच्या
125 व्या जयंतीनिमित्त नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली एकूण 38 जागा रिक्त आहेत. शालेय
विद्यार्थीनींसाठी प्रवेश अर्ज. (इयत्ता 8 वी मध्ये सन 2018-19 मध्ये प्रवेश
घेतलेले) विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन (मॅन्युअली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी
दि. 15-06-2018 ते दि. 04-07-2018 असा आहे. सन 2018-2019 च्या रिक्त जागा खासबाब-3
जागा रिक्त आहेत.
तसेच
इयत्ता १० वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी
(इयत्ता ११ वी मध्ये सन 2018-19 मध्येप्रवेश घेतलेले) (कनिष्ठ महाविद्यालय)
(व्यावसायीक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन (मॅन्युअली) प्रवेशासाठी
अर्ज करावयाचा कालावधी दि. 15-06-2018 ते दि. 20-08-2018 असा आहे. सन 2018-2019
च्या रिक्त जागा अनुसूचित जाती-12, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग-1, अशा
एकूण 13 जागा रिक्त आहेत.
तसेच बी.ए./ बी.कॉम/ बी.एस.सी.(सन
2018-2019 मध्ये प्रमथ वर्षास प्रवेश) अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश
घेतलेल्या पदवीका / पदवी आणि एम.ए. / एम. कॉम. / एम.एस.सी. असे पदवी नंतरचे
पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम. (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळुन)
अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन (मॅन्युली)
प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि. 15-06-2018 ते दि. 24-07-2018 असा असून
त्यासाठी सन 2018-2019 च्या रिक्त जागा अपंग-1, अनुसूचित जाती-7, इतर मागासवर्ग व
विशेष मागास प्रवर्ग-1, अशा एकूण 9 जागा रिक्त आहेत.
व्यावसायीक अभ्यासक्रम. (प्रमथ वर्षे प्रवेश)
अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा
कालावधी दि. 15-07-2018 ते दि. 28-08-2018 असा असून त्यासाठी सन 2018-2019 च्या
रिक्त जागा अपंग-1, अनाथ-1, अनुसूचित
जाती-9, विजाभज-2 अशा एकूण 13 जागा रिक्त आहेत.
तरी हिंगोली जिल्ह्यातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थीनींनी
सदर वसतिगृहात प्रवेशाचे अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घ्यावे. तसेच अर्जासोबत उत्पनाचे
प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डची छायाकिंत प्रत, विद्यार्थीनींच्या बँकेचे
खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न करुन घेतलेले असावे. तसेच अर्जावर नमुद कागदपत्रासह
उपरोक्त प्रमाणे पात्र असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थीनींनी आर्थिकदृष्टया मागास व मागासवर्गीय मुलींचे शासकीय
वसतिगृह, हिंगोली व डॉ. बा. आं.
यांच्या 125 व्या जयंती निमित्त नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली या दोन्ही वसतिगृहात प्रवेशासाठी जास्तीत-जास्त पात्र मागासवर्गीय
विद्यार्थीनींनी स्वंतत्र वेगवेळे आवेदनपत्र (अर्ज) सादर करावेत असे आवाहन,
गृहपाल हिंगोली यांनी केलेले आहे.
****
No comments:
Post a Comment