12 July, 2018

अनुसूचित जाती व नवबौध्दासाठी अनुदान व बीज भांडवल योजना

अनुसूचित जाती व नवबौध्दासाठी अनुदान व बीज भांडवल योजना 
हिंगोली,दि.12:अनुसूचित जाती व नवबौध्द लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये महामंडळाच्या राज्य शासन पुरस्कृत 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनांचा लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या अर्जदारांना दिनांक 11 जुलै, 2018 पासून महामंडळाच्या  www.mahatmaphulecorporation.com/applications या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
सदर योजने अंतर्गत इच्छुक अर्जदारांना महामंडळाकडून कर्ज घेण्याकरिता अर्जदारांनी त्यांचे स्वत:चे ई-मेल अकाऊंट वापरुन ऑनलाईन पध्दतीने कर्ज मिळण्याकरिता कर्ज मागणीचा अर्ज करावा.  तसेच ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी मागणी अर्जाची मूळ प्रत व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित/स्वयंसाक्षांकित प्रती जिल्हा कार्यालयात स्वत: सादर करावीत. त्रयस्थ व्यक्तीकडून अर्ज किंवा इतर कोणतेही कागदपत्र स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्यादित), हिंगोली यांनी कळविले आहे.
****

No comments: