18 July, 2018

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात प्रवेश 21 जुलै पर्यंत


सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात प्रवेश 21 जुलै पर्यंत
हिंगोली,दि.18:जिल्हयात सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलां/मुलींचे एकूण 8 शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत. सदर वसतिगृहामध्ये सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशासाठी सन 2017-2018 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या मागासवर्गीय पात्र मुलां / मुलींनी अर्ज करण्यासाठी मा.आयुक्तालयाचे पत्र क्रं. 2359 अन्वये दिनांक 15-06-2018 ते 20-08-2018 अशी तारीख दर्शविलेली होती.
                परंतु संदर्भीय दुरध्वनी संदेशानुसार सन 2017-2018 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या मागासगर्वीय विद्यार्थ्यांचे अनुक्रमे इयत्ता 11 वी मध्ये व पदवी प्रथम वर्षात प्रवेश झालेले असून वसतिगृहात प्रवेशासाठी विलंब होत असल्याची निवेदने प्राप्त होत असल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता दिनांक 15-06-2018 ते         दिनांक 20-08-2018 तारीखे ऐवजी  दिनांक 15-06-2018 ते 21-07-2018 अशी तारीख संदर्भीय दुरध्वनी संदेशानुसार देण्यात आलेली आहे. 
                करिता हिंगोली जिल्हयातील मागासवर्गीय पात्र मुलां / मुलींनी सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृहात प्रवेशासाठी जास्तीत जास्त आवेदन पत्र दिनांक 21-07-2018 रोजी कार्यालयीन वेळेत त्या-त्या वसतिगृहाचे गृहपालांकडे सादर करावेत अन्यथा या तारखेनंतर प्राप्त झालेले प्रवेशासाठीचे आवदेन पत्र स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांनी केले आहे.


00000

No comments: