समुपदेशन
शिबिराचे आयोजन
हिंगोली, दि.02: शहरातील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याकरिता दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 10 ते 02
वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने थेट
प्रक्षेपणाद्वारे विद्यार्थी व पालकांना
समुपदेशन करण्यात येणार आहे.
इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या
क्षेत्रात सर्वोत्तम दिशा दर्शविण्यासाठी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व शासकीय तंत्रनिकेतनच्या
संयुक्त विद्यमाने दिनांक 3 जुलै रोजी थेट प्रक्षेपणाद्वारे विद्यार्थी व
पालकांसाठी समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमात राज्यातील
अग्रगण्य विषय तज्ज्ञ व उद्योजक थेट
प्रक्षेपणाच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार असून
तंत्रज्ञान विषयक शंकांचे निरसन कार्यक्रमादरम्यान करणार आहेत. या समुपदेशन
शिबिरासाठी शहर व परिसरातील 10 वी आणि 12 वी
परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी तसेच
पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
असे आवाहन प्राचार्य डॉ. रणजित सावंत यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment