31 July, 2018

प्रसार माध्यम प्रतिनिधीसाठी ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ विषयावरील कार्यशाळेचे आज आयोजन


प्रसार माध्यम प्रतिनिधीसाठी ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’
विषयावरील कार्यशाळेचे आज आयोजन

हिंगोली,दि.31: मागील काही कालावधीत काही समाजकंटक समाज माध्यमातून ‘मुले चोरणारी टोळी आपल्या भागत आहे’ अशी खोटी अफवा पसरवत आहेत. या अफवामुळे निर्दोष वाटसरू, प्रवाशी, आणि अन्य नागरिक, ग्रामस्थ आदींना मारहाण करणे, तसेच त्यांचा छळ करणे असे प्रकार वाढत आहेत. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूजबाबत दक्षता घेण्यासाठी जनजागृती व प्रसार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलिस अधिक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ या विषयावर प्रसार माध्यमांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेचे आयोजन हे बुधवार 1 ऑगस्ट, 2018 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, हिंगोली येथील नागनाथ सभागृहात दुपारी 12.00 वाजता  करण्यात आले आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून समाज माध्यमांवरुन येणारी फेक न्यूज कशी ओळखायची, त्याविषयी कशी दक्षता घ्यावयाची याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व संपादक, जिल्हा प्रतिनीधी, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, छायाचित्रकार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
****

No comments: