मदरसा
आधुनिकीकरण योजने अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.4: जिल्ह्यातील
मदरसा आधुनिकीकरण योजना मंत्रीमंडळाच्या मान्यतेनुसार शासन निर्णय क्रमांक अविवि/
2010/प्र.क्र.152/10/का.6/दि.11.10.13 अन्वये करण्यात आले आहे. सदर योजनेअंतर्गत
पात्र मदरसाची तसेच राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहूल शासन मान्य
खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये
पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना शासन निर्णय दि.7.10.2015 अन्वये
राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत मदरसा, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक
प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा यांचे
प्रस्ताव सादर करणेबाबत सदर योजना सन 2018-19 राबविण्यात येणार असून अनुदान मिळू
इच्छिणाऱ्या मदरसा, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग
शाळा यांनी दिनांक 14.8.2018 रोजी सायंकाळी 5.00 वा. अल्पसंख्यांक विकास विभाग,
जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे अर्ज व नमूद सर्व
कागदपत्रे दाखल करण्याचे जिल्हाधिकारी यांचे कडून आवाहन करण्यात येत आहे.
000
No comments:
Post a Comment