अपंग
व मुकबधीर मुला-मुलींना व्यवसाय प्रशिक्षण संस्थेत प्रवेश
हिंगोली,दि.12: अपंग कल्याण आयुक्तालय म.रा. पुणे मार्फत शासन
मान्यता प्राप्त तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर या संस्थेत म.रा.
व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई मार्फत शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी
18 ते 40 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. सदरील
प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (हार्डवेअर व कॉम्युटराइज्ड अकाऊंटींग अँड
ऑफिस ॲटोमेशन), वेल्डर कम फॅब्रीकेटर, कंपोजिंग प्रिंटींग अँड बायडींग, शिवन कर्तन
कला, टंकलेखन, वीजतंत्री इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे.संस्थेत
अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत
पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकीय
औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामुल्य
सोय केली आहे.
इच्छुक अपंग मुला-मुलींनी पालकांनी
दिनांक 25 जुलै, 2018 पर्यंत प्राचार्य, तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,
शिवनेरी नगर, रामपूर रोड देगलूर जि. नांदेड
मो. क्र.9403207100, 9960900369, 7385207093, 9503078767 येथे संपर्क
साधावा .
****
No comments:
Post a Comment