02 July, 2018

हिंगोली येथील शासकीय वसतिगृहातील कर्मचारी राजेश पांढरे गैरहजर


हिंगोली येथील शासकीय वसतिगृहातील कर्मचारी राजेश पांढरे गैरहजर
हिंगोली,दि.02: आर्थिकदृष्टया मागास व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली ता.जि. हिंगोली येथे श्री. राजेश विश्वनाथ पांढरे स्वंयपाकी या पदावर दिनांक 01 फेब्रुवारी, 2016 रोजी मध्यान्हपुर्व रुजू झालेले आहेत. परंतू दिनांक 10 मार्च, 2016 पासून विनापरवानगी सतत गैरहजर असल्याने त्यांचे सेवा पुस्तकात नमुद केलेल्या पत्ता  रा. पेन्शनपुरा, ता. जि. जालना या पत्यावर या वसतीगृहाकडून व मा.सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांचेकडून वारंवार पत्रव्यवहार केला आहे. तसेच ओळख चिन्हे म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांचे गळ्यावर व छातीवर अनुक्रमे दोन तीळ असल्याची नोंद त्यांचे सेवा पुस्तकात आहे.
परंतु आजपर्यंत श्री. राजेश विश्वनाथ पांढरे स्वंयपाकी हे सतत गैरहजर असून असा व्यक्ती कोठे सापडल्यास किंवा आढळून आल्यास गृहपाल, आर्थिकदृष्टया मागास व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, डॉ.जयदिप देशमुख यांची इमारत, अकोला बाय-पास, हिंगोली येथे संपर्क साधावा. तसेच गैरहजर कालावधीत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याबाबत सामाजिक न्याय विभाग वसतीगृह प्रशासन जबाबदार राहणार नाही.
संबंधित कर्मचाऱ्यास ही शेवटीची संधी म्हणून श्री. राजेश विश्वनाथ पांढरे, रा.पेन्शनपुरा, ता. जि. जालना यांनी किंवा त्यांचे जवळचे सर्व नातेवाईक यांनी संबंधिताचा शोध घ्यावा, असे आवाहन गृहपाल, आर्थिकदृष्टया मागास व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली यांनी केलेले आहे.
00000
                                                                       

No comments: