कॅरेज
बाय रोड नियमातंर्गत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आरटीओचे आवाहन
हिंगोली, दि.02: कॅरेज बाय रोड अधिनियम 2007 च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते
वाहतुक व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांचे अधिसूचना क्र. जीएयआर-176 (ई)
दिनांक 28 फेब्रुवारी, 2011 नुसार कॅरेज बाय रोड नियम 2011 प्रसिध्द करण्यात आले
असून सदर नियम अधिसूचना प्रसिध्द करण्याच्या दिनांकापासून लागू झाले आहेत. सदर
नियम केंद्र शासनाच्या www.morth.nic.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
सदर नियमानुसार माल वाहतूक
व्यवसायातील वाहतुक दार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतुक कंपनी,
कागदपत्रे, पाकीटे, मालाची घरपोहोच वाहतुक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची
साठवणुक करणारे, वितरक, माल जमा करणारे
व्यावसायिक यांना कॉमन करिअर
म्हणून क्षेत्रिय नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे
अर्ज करुन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे
आवश्यक आहे.
वरीलप्रमाणे सर्व संबंधितांना अवगत करण्यात येते की, हिंगोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी
संपर्क साधून सदर नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, अन्यथा मोटार वाहन
अधिनियम तसेच नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment