मौजे वगरवाडी सर्वे
क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली,दि.04: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम
33 (1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा , जि. हिंगोली येथील फायरींग रेंज सर्वे
नं.25 व 29 या परिसरात दिनांक 4 जुलै ते 29 ऑगस्ट 2018 पर्यंत पोलीस
कर्मचाऱ्यांना वार्षिक गोळीबार सराव करण्यास परवानगी देण्यात येत आहे . दिनांक 4, 7, 11, 14, 18, 28 जुलै व 1, 4, 8, 14, 22, 29 ऑगस्ट 2018 या
दिनांकांस खालील अटीवर गोळीबार सरावासाठी मैदान उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र
म्हणून घोषित करण्यात आले आहे परिसरात गुरांना
न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना पोलीस
अधिकारी यांनी दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे संबंधित गावी
सर्व संबंधितांना द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन
हट्टा यांनी मौ. वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीद्वारे व
ध्वनीक्षेपकाद्वारे या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली
यांनी कळविले आहे .
00000
No comments:
Post a Comment