अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत नोंदणी
करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.4: महाराष्ट्र इमारत व
इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत बांधकाम कामगाराची नोंदणी
करण्याकरीता शासनाने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत विशेष नोंदणी अभियान टप्पा-2 चा शुभारंभ दिनांक 4 जुलै 2018
रोजी करण्यात येत असून सदरील अभियान हे 31 जुलै 2018 पर्यंत चालणार असून सदरील
अभियानात हिंगोली जिल्ह्यातील सर्व बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी या अभियानात
सहभाग नोंदवून जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करावी , असे आवाहन सरकारी कामगार
अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment