ऑनलाईन त्रैमासिक
विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.9: जिल्ह्यातील सर्व
शासकीय/निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी माहे जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली जुलै-2018 या महिन्याचे मासिक वेतन
देयक दाखल करताना यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीबाबतचे माहे
जून 2018 अखेरचे ई आर 1 त्रैमासिक विवरणपत्र माहे 30 जुलै 2018 पर्यंत भरावयाची आहे.
सदर माहिती कार्यालयाचे संकेतस्थळ www.mahaswayam.in वरुन ऑनलाईन ई आर 1 भरुन
दिल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व इतर
कोणतेही देयके स्विकारली जाणार नाहीत. सर्व कार्यालयांना या कार्यालयामार्फत युजर
आयडी आणि पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले
ई-मेल आयडी, फोन नंबर, पत्ता, टॅन नंबर, पॅन नंबर टाकून आपली प्रोफाईल अपडेट
करावी, असे सहायक संचालक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी कळविले
आहे.
000000
No comments:
Post a Comment