अटल आरोग्य महाशिबिर ;
1 लाख रुग्णांची तपासणी
हिंगोली,दि.10: अटल आरोग्य महाशिबिरातंर्गत नोंदणी झालेल्या विविध आजारांच्या सुमारे 1 लाख
रूग्णांनी प्रत्यक्ष उपस्थिती राहून तपासणी करून घेतल्याची माहिती शिबिर संयोजन
समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
संकल्पनेतून व राज्याचे वैद्यकीय शिक्षण तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य विनामूल्य ‘अटल आरोग्य महाशिबीर’ रविवारी 10 फेब्रूवारी रोजी येथील रेल्वे स्टेशन
परिसरातील 25 हेक्टरच्या भव्य
मैदानात पार पडले.
यावेळी आरोग्य महाशिबिरास येणारा प्रत्येक रुग्ण व
नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. येणारा
प्रत्येक रुग्ण समाधानाने परत जाईल याची संपूर्ण जबाबदारी घेण्यात आली होती. या
शिबीरासाठी 65 हजार रुग्णांची पूर्वतपासणी करण्यात आली होती. त्या सर्व रुग्णांची
राज्यातील नामांकित डॉक्टरांमार्फत शिबिरात तपासणी झाल्यानंतर नागपूर येथेच सर्व
शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आरोग्य शिबिरासाठी येणाऱ्या
गरीब व गरजू सर्व रुग्णांना नि:शुल्क भोजन व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात
आली होती. सर्व रुग्णांना औषध व आवश्यक साहित्य देखील यावेळी पूरविण्यात आले.
आरोग्य शिबिरामध्ये प्रारंभी रुग्णांची नोंदणी झाल्यानंतर त्यांची तज्ज्ञ
डॉक्टर्समार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर आवश्यकतेनुसार औषध, एमआरआय,
सीटीस्कॅन, रक्ताच्या तपासण्या, शस्त्रक्रिया व आवश्यकतेनूसार यंत्रांची देखील
उपलब्धता यावेळी शिबीरात करण्यात आली. संपूर्ण शिबिरामध्ये विविध पॅथीचे सुमारे
दीड हजार डॉक्टर्स आणि 29 ओपीडींमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी
दंतचिकित्सा व शस्त्रक्रियेसाठी चार मोबाइल व्हॅन देखील उपलब्ध करण्यात आल्या
होत्या. तपासणीशिवाय एकही रुग्ण
येथून परत जाणार नाही. यांची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. स्वतंत्र व्यवस्था
करुन येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.
यावेळी शिबिरात आलेल्या रुग्णांची नामाकिंत
डॉक्टरांमार्फत तपासणी करुन सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यात आल्या. तसेच
सुमारे सव्वा कोटी रुपयांची औषधी याठिकाणी वितरण केली. याशिवाय रुग्ण व नातेवाईक
यांच्यासाठी जेवण, चहा, पाणी याची ही व्यवस्था करण्यात आली होती. या
आरोग्य शिबीरात ज्यांच्यावर उपचार करणे शक्य नाही, अशा रुग्णांना नागपूर, नांदेड,
औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे नेवून त्यांच्यावर अत्याधूनिक पध्दतीचे उपचार केले जाणार आहेत. महात्मा
ज्योतीबा फुले आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच समाजातील दानशुर
व्यक्ती यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
या महाआरोग्य शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी
आमदार तान्हाजी मुटकुळे, रामेश्वरजी नाईक, संदीप जाधव, गजानन घुगे, शिवाजी जाधव,
जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.
तुम्मोड, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिपचे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, तहसीलदार गजानन शिंदे, हिंगोली नगर
परिषदेचे मुख्याधीकारी रामदास पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्यासह विविध
विभागातील अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग, विविध खासगी
दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना,
वैद्यकीय संघटना, सामाजिक संघटना आदींनी यशस्वी नियोजनासाठी सहकार्य केले.
****
No comments:
Post a Comment