रविवारी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ
· पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार 2 हजार रूपयांचा पहिला
हप्ता
· उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे होणार योजनेचा शुभारंभ
हिंगोली,दि.22: केंद्र शासनाने
शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजना घोषित केली आहे. पात्र
शेतकरी बांधवाना थेट आर्थिक मदत देणारी ही महत्वाची योजना आहे. या योजनेतंर्गत
लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यात दिले जाणार आहे. या प्रधानमंत्री किसान
सन्मान निधी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर
प्रदेशातील गोरखपूर येथे रविवार, दिनांक 24 फेब्रूवारी रोजी होणार आहे. यावेळी
प्रधानमंत्री यांच्या हस्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेतंर्गत 2 हजार
रुपयांचा पहिला हप्ता ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे. जस-जशा शेतकरी
लाभार्थ्यांच्या याद्या शासनास प्राप्त होतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थ्यांच्या
खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.
या शुभारंभ कार्यक्रमा प्रसंगी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे सकाळी
10:30 वाजता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची माहिती देण्यात येणार असून,
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे होणार आहेत. यानंतर सकाळी 11:00 वाजता ‘मन की
बात’ या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. यानंतर सकाळी 11:30 वाजता प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ
कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात काही शेतकरी
लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्याने राज्यस्तर,
जिल्हास्तर व गटस्तर आणि कृषि विज्ञान केंद्रामध्ये उद्घाटन होणार असून, रविवार 24 फेब्रूवारी
रोजी सकाळी
10:30 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात ‘प्रधानमंत्री किसान
सन्मान निधी’ योजनेचा जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण योजनेच्या
शुभारंभ कार्यक्रमास जिल्ह्यातील संसद सदस्य, आमदार तसेच लोकप्रतिनीधी, शेतकरी
बांधव, शेतकरी उत्पादक संस्था, पत्रकार यांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित
रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment