माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उमेदवारीची संधी
हिंगोली, दि.16 : जनसंवाद क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी टाटा ट्रस्टस्च्या
सहकार्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप) उपक्रमाची संधी
उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात १० उमेदवार ११महिन्यासाठी मानधन तत्वावर काम करतील.या
उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन होईल. इच्छुक उमेदवार maharecruitment.mahaonline.gov.in या
संकेतस्थळावर २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात (अर्जाचे शुल्क लागू).या
उपक्रमात निवडण्यात आलेल्या उमेदवारांना प्रती महिना रू २५ हजार (आयकर आणि अंशदायी
भविष्य निर्वाह निधी वजा जाता अंदाज सुमारे २२ हजार रू.)
मानधन देण्यात येईल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात
येईल.या कार्यक्रमांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत खलील पदांसाठी अर्ज
मागविण्यात येत आहेत.
संहिता लेखक (एकूण पदे - ५ ) मराठी (३), हिंदी (१) आणि इंग्रजी (१) (सर्व पदे मुंबई
कार्यालयासाठी) (पात्रता-जनसंवादातील पदवी, अनुभवास प्राधान्य.)
सोशल मीडियासाठी संहिता लेखक - (एकूण पदे -१ )( पात्रता- कोणतीही पदवी, सोशल मीडियाशी
संबंधित लघु अभ्यासक्रम केला असल्यास अथवा सोशल मीडिया क्षेत्रातील अनुभव असल्यास अथवा
जनसंवादातील पदवी असलेल्या आणि सोशल मीडिया क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारास
प्राधान्य.)
ग्राफिक डिझाईनर - (एकूण पदे - २)( पात्रता- फाईन / ॲप्लाईड आर्टमधील पदवी, अनुभवास
प्राधान्य.)
व्हिडिओ ॲनिमेटर -(एकूण पदे - २) ( पात्रता- ॲनिमेशन विषयातील पदवी, अनुभवास प्राधान्य.)
अर्जदाराने पुढील बाबींची पूर्तता
करणे आवश्यक आहे -अर्जदाराने आवश्यक पदवी किमान ५० टक्के गुणांसह अथवा बी ग्रेडसह प्राप्त
केलेली असावी,एमएस ऑफिस तसेच ज्या विषयात काम करण्यासाठी अर्ज केला आहे त्या विषयातील
संगणकप्रणालीची माहिती असणे आवश्यक,३१ डिसेंबर २०१८ रोजी अर्जदाराचे वय ३० वर्षापेक्षा
जास्त नसावे,संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या तसेच शासन किंवा शासनाशी संबंधित प्रकल्प
किंवा योजनेतील अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल,उमेदवाराकडे स्वतःचा
अत्याधुनिक स्वरुपाचा लॅपटॉप असणे आवश्यक आहे,हा कार्यक्रम म्हणजे शासकीय सेवा नसेल.
त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे कोणतेही लाभ उमेदवारांना देण्यात येणार नाही
०००००
No comments:
Post a Comment