15 February, 2019

ऑनलाईन शिष्यवृत्ती अदायगीची प्रक्रीयेकरिता अर्जातील त्रूटींची पूर्तता करण्याचे आवाहन - सहाय्यक आयुक्त समाज कल्याण


ऑनलाईन शिष्यवृत्ती अदायगीची प्रक्रीयेकरिता
अर्जातील त्रूटींची पूर्तता करण्याचे आवाहन
                                                        - सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

हिंगोली,दि.15: सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकाराच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल 1 ऑक्टोबर, 2018 पासुन नव्याने कार्यान्वीत झालेली आहे. https://mahadbt.mahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती/फ्रिशिप योजनेकरीता ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केलेले आहे. सदर अर्ज संबंधीत महाविद्यालयाकडुन तपासुन व पडताळणी करुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली  यांचेकडे मान्यतेस्तव सादर करण्यात येत आहेत. महाविद्यालयाकडुन प्राप्त झालेल्या अर्जावर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांच्याकडुन ऑनलाईन मान्यता देण्यात येत आहे.
सद्य:स्थितीत महाविद्यालय स्तरावर अद्यापही सुमारे 15 टक्के अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधीत महाविद्यालयानी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्ज संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे फॉरवर्ड करुन तात्काळ निकाली काढावेत.
तसेच नोंदणीकृत अर्जांपैकी सुमारे 20 टक्के अर्ज विद्यार्थ्यांनी अथवा महाविद्यालयाने अर्ज मंजूर होण्यापूर्वी  त्यांच्या स्तरावरुन अर्ज रद्द केलेले आहेत. सदर रद्द केलेल्या अर्जांपैकी पात्र असलेल्या अर्जांची  त्वरीत त्रुटी पूर्तता करुन असे अर्ज विद्यार्थ्यांनी पुन:श्च ऑनालाईन सादर करावेत. तसेच महाविद्यालयांनी सदर अर्ज संबंधित लॉग इन वरुन मान्य करुन पुढील कार्यवाहीस्तव सहायक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावेत.
सदर पोर्टलवर मान्य झालेल्या अर्जाची अदायगीची प्रक्रिया यशस्वी होण्याकरीता विद्यार्थ्यांच्या लॉग इन मधुन रिडम्शन प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. सदर ऑनलाईन प्रक्रीया पूर्ण न केल्यास मान्य झालेली विद्यार्थी  व महाविद्यालयाची शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंद घ्यावी,  रिडम्शन व्हाऊचर जनरेट झाले असून देखील रिडम्शन प्रक्रीया न केलेल्या विद्यार्थ्यांवर महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी. विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक प्रणालीमध्ये अचूक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत केलेले बँक खाते क्रमांक आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. अदायगीच्या प्रक्रीयेमध्ये प्रत्येक स्तरावर एस.एम.एस. येणेस्तव मोबाईल क्रमांक हा आधार तसेच नोंदणीकृत बँक खात्याशी संलग्न असून तो अद्ययावत असणे आवश्यक आहे.  या सर्व सूचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर न जमा झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही याची सर्व प्राचार्य व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, तसेच महाविद्यालयातील/विद्यार्थी प्रतिनिधी (UR,GS,SR) यांना उपरोक्त सूचना विविध माध्यमातुन विद्यार्थ्यांना तात्काळ कळवाव्यात, असे आवाहन भाऊराव चव्हाण, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी  केले आहे.
****




No comments: