गंगाखेड आणि
हिंगोली येथे कापूस खरेदी केंद्र सुरु
हिंगोली, दि.18: हंगाम 2018-19 मध्ये कापूस पणन महासंघाची नियुक्ती सीसीआयचे सब एजंट
म्हणून राज्याचे मर्यादेत हमी दराने कापूस खरेदी करीता झालेली आहे. विभागामध्ये
हमी दराने कापूस खरेदी करणे करीता परभणी विभागात गंगाखेड, जि.परभणी आणि हिंगोली,
जि. हिंगोली ही केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत.
कापूस पणन महासंघाद्वारे संगणकीय
कार्यप्रणाली विकसित केलेली असून सदर कार्यप्रणालीद्वारे शेतकऱ्यांनी विक्री
केलेल्या कापसाची रक्कम थेट त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यांत जमा होणार आहे.
तरी सर्व शेतकऱ्यांनी कापूस विक्री करतेवेळी
7/12 उतारा, आधारकार्ड आणि बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
सोबत आणावे, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक, परभणी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment