माविममार्फत कापडी
पिशव्या उत्पादनाचे युनिट सुरु होणार
हिंगोली, दि.8: प्लास्टिक
बंदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मुबलक प्रमाणावर कापड पिशव्या उपलब्ध व्हाव्यात
यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळने युनिट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता
जिल्हा नियोजन समितीकडून 20 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आले असून, या
युनिटद्वारे रोज बचत गटातील शिवणकाम करणाऱ्या महिलांकडून 1200 कापडी पिशव्याचे
उत्पादन होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये
प्लास्टिक बंदी लागू झाल्याने कापडी पिशव्याची मागणी वाढलेली आहे. परभणी व नांदेड
जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटाने तयार केलेल्या
कापडी पिशव्यांना मोठी मागणी आहे.
या
महिलांचे शिवण कौशल्य पाहून खाजगी दुकानदारही त्यांच्याकडून आता शाळेचे गणवेशष
शिवून घेत आहेत. कापडी पिशव्याची असलेली गरज आणि खरेदीसाठीचा वाव याचा विचार करता
प्रत्येक जिल्ह्यात अशा पध्दतीने पिशव्या शिवण्याचे युनिट उभारण्याची योजना
महामंडळाने आखली आहे. त्यानुसार आता हे 30 महिलांचे युनिट तयार होणार असून, यातील
20 महिला आप-आपल्या घरी बसून पिशव्याची शिवण काम करतील. ज्या महिला मशीन खरेदीची
करु शकत नाही, अशा महिलां उत्पादन केंद्रामध्ये जाऊन शिलाईचे काम करणार आहे.
यानंतर
या शिवलेल्या पिशव्यांवर एकत्रित छपाई करण्यात येईल. या कामातून प्रत्येक महिलेला
दिवसाकाठी किमान 300 रुपये मिळणार असून, दरमहा एका महिलेस सुमारे रु. 7,500
प्रतिमहा उत्पन्न मिळू शकणार असून हिंगोली येथे एक युनिट सुरु करण्यासाठी एकूण 30
महिलांच्या एक युनिट साठी जिल्हा नियोजन समितीकडून 20 लाख 50 हजार रुपये मंजूर
करण्यात आलेले आहेत. शहरी भागातील बचत गटातील महिलांना आर्थिक पाठबळाअभावी स्वत:चा
व्यवसाय सुरु करता येत नाही त्या सर्वांपर्यंत काम पोहचत नाही . म्हणूनच या
युनिटच्या माध्यमातून काही महिलांना रोज काम देण्यात येईल.
000
No comments:
Post a Comment