02 February, 2019

मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध


मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली,दि.02:  महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख)  व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा , जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं.25 व 29 या परिसरात दि. 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2019  पर्यंत  पोलीस कर्मचाऱ्यांना  वार्षिक गोळीबार  सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे.  दिनांक 15,19,22,29 जानेवारी आणि 5,9,12,16,19,23,26 व 28 फेब्रुवारी 2019 या दिनांकांस पुढील अटी वर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे  परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही  व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा ना. व पोलीस  स्टेशन हट्टा  यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट व परिसरात  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
000000

No comments: