02 February, 2019

शस्त्र परवाना युएनआय क्रमांक प्राप्त करुन घेण्याचे आवाहन


शस्त्र परवाना युएनआय क्रमांक प्राप्त करुन घेण्याचे आवाहन
        हिंगोली,दि.2: केंद्र शासनाद्वारे अधिसूचना क्र.जी.एस.आर.644(इ) दिनांक 12 जुलै 2018 अन्वये शस्त्र नियम 2016 मधील नियम 15(2) मध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार दिनांक 1 एप्रिल 2019 नंतर कोणताही शस्त्र परवाना युआयएन क्रमांकाशिवाय अवैध समजण्यात येईल असे सूचित केले आहे. तरी हिंगोली  जिल्ह्यात शस्त्र परवानाधारक यांनी त्यांच्या परवान्याचे ऑनलाईन युआयएन क्रमांक तयार झाल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे समक्ष येऊन अथवा मोबाईल क्रमांक 8208639738 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून खात्री करुन घ्यावी. तसेच दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत युआयएन क्रमांक प्राप्त करुन न घेतल्यास अशा परवाना धारकांचे शस्त्र परवाने अवैध समजण्यात येतील व त्याची सर्वस्वी जबाबदारी परवानाधारकांवर राहील याची सर्व परवाना धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे.
0000000

No comments: