पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा
दौरा
हिंगोली, दि.5: सामाजिक न्याय आणि विशेष
सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे
राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
येत असून, त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
बुधवार, दिनांक 6 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 11.30 वाजता
शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव, दुपारी 2.00 वाजता छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याचे अनावरण (स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज चौक,
शासकीय विश्रामगृह परिसर, हिंगोली), दुपारी 2.15 वाजता महिला बचत गट व शेतकरी
मेळाव्यास उपस्थिती (स्थळ : रामलिला मैदान, हिंगोली), दुपारी 4.00 वाजता हिंगोली
येथून वाहनाने परभणी कडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment