अल्पसंख्याक
समाज विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात
- ज. मो.
अभ्यंकर
हिंगोली,दि.19: केंद्र व राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासाकरीता
विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळावा
याकरीता सर्व संबंधित विभागांनी सदर योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी दिल्या.
येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रविणकुमार घुले,
शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) संदीपकुमार सोनटक्के, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त
भाऊराव चव्हाण,जि.प.चे कार्यकारी अभियंता (बां) पी.एन.वायचळकर,यांची उपस्थिती
होती.
यावेळी श्री. अभ्यंकर म्हणाले की, अल्पसंख्याक
समाजाच्याप्रधानमंत्री 15 कलमी
कार्यक्रमासोबतच्या अल्पसंख्याक कल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात. अल्पसख्यांक
आयोगाचे कामकाज ठराविक समाजापुरते मर्यादीत न ठेवता अल्पसंख्यांकातील सर्व
समाजघटकांपर्यंत पोहचले पाहिजे. या योजनापासून कोणताही समाजघटक वंचित राहता कामा
नये.
अल्पसख्यांक संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा
नियोजन समितीकडे प्रलंबित प्रस्ताव तातडीने निर्गमीत करावेत. शहरातील ऊर्दु
शाळांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून लवकरात लवकर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच
शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत. अल्पसंख्यांक
समाजाच्या योजना वंचित घटकापर्यंत पोहचण्यासाठी अल्पसंख्यांक कल्याण समिती स्थापन
करण्याची सुचनाही त्यांनी दिली. तसेच प्रधानमंत्री आवास योजना आणि शिष्यवृत्ती योजनाबरोबरच श्री. अभ्यंकर यांनी अल्पसख्यांक
समाजासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा विभाग निहाय आढावा
घेतला. जिल्ह्यातील अल्पसंख्याक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालक
यांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. त्या तात्काळ मार्गी लावाव्यात अशा
सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांनी
प्रास्ताविकेत जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध राबविलेल्या कल्याणकारी
योजनांची सविस्तर माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment