सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा
संस्थांना विनानिविदा कामे देण्यात यावे
- श्री एच.पी.तुम्मोड
हिंगोली, दि.8: जिल्ह्यातील सुशिक्षित
बेरोजगारांच्या सेवा संस्थांना रू.3 लाखापर्यंत मर्यादेतील कामे विना निविदा देण्यात
यावे असे आवाहन जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.
सुशिक्षित बेरोजगारांच्या
सेवा संस्थांना काम वाटप समितीची बैठक दि. 29 जानेवारी संपन्न झाली. या बैठकीत जि.प.
(बांधकाम विभाग) यांच्याकडून प्राप्त झालेले जिल्हा परिषद इमारत व परिसराची दैनंदिन
स्वच्छता करणे बाबतचे काम संत भगवान बाबा सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थेला देण्यात
आले. बैठकीत काम वाटप समितीच्या सदस्य सचिव श्रीमती रेणुका तम्मलवार सहायक संचालक,
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी जिल्ह्यातील विविध कार्यालयाकडे
उपलब्ध असलेली मोठ्या प्रमाणातील रू. 3 लाखापेक्षा कमी किंमतीची कामे विविध सेवा संस्थेला
उपलब्ध करून देता येतात. यामध्ये स्वच्छता, साफसफाई, सुशोभिकरण, रंगरंगोटी, दुरूस्ती,
सुरक्षा रक्षक, धोबीकाम, माळीकाम, प्रचार प्रसिध्दी व जनजागृती विषयक काम,इ. प्रकारची
कामे जिल्ह्यातील विविध शासकीय/निमशासकीय/महामंडळे इ. कार्यालयाकडे उपलब्ध असल्यास
ती त्वरीत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांना
कळवावीत. जेणेकरून सहकारी सेवा सोसायट्या/लोक सेवा केंद्रांना आर्थिकदृष्ट्या बळकट
करून स्वयंरोजगारास वाव असलेल्या क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या बेरोजगारांच्या सहकारी
सोसायट्या/लोक सेवा केंद्रे यांच्या मार्फत ग्रामीण तसेच शहरी जनतेला दैनंदिन गरजेच्या
सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश सफल होईल. तरी कार्यालयांनी रू. 3 लाखापर्यंतची कामे
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयाकडे
कळवावीत असे आवाहन ही अध्यक्ष काम वाटप समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. हिंगोली
व श्रीमती रेणुका तम्मलवार सदस्य सचिव काम वाटप समिती तथा सहायक संचालक, कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment