15 February, 2019

जलसमृध्दी यंत्रसामुग्री व्याज अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना यंत्रसामुग्री खरेदी करण्याचे आवाहन



जलसमृध्दी यंत्रसामुग्री व्याज अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना
यंत्रसामुग्री खरेदी करण्याचे आवाहन

        हिंगोली,दि.15:  महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर 2018 अन्वये हिंगोली जिल्ह्यातील 149 पात्र अर्जदारांपैकी या पूर्वी पात्र व अपात्र ठरलेल्या 16 अर्जदार व एकाच नावाचे दोन अर्ज प्राप्त झालेले व लाभार्थी  गटा व्यतीरिक्त इतर गटाची प्राप्त अर्ज एकूण 9 असे एकूण 25 अर्जदार कमी होऊन एकूण 124 अर्जदारांची सोडत दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी काढण्यात आली. सदरील सोडतीमध्ये उर्वरीत लक्षांकाबाबत 43 भाग्यवान अर्जदार निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 7 अर्जदारांनी दिनांक 13 फेब्रुवारी 2019 पर्यंत मशीन खरेदी केल्याचे पुरावे या कार्यालयास सादर केले आहे.
            दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी उर्वरीत 81 अर्जदारांची प्रतिक्षाधीन यादी सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली होती. करिता 81 प्रतिक्षाधीन यादीपैकी 50 लक्षांकाची पूर्तता करण्यासाठी उर्वरित 36 अर्जदारांची यादी या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. आज रोजी पर्यंत एकूण 50 लक्षांका पैकी 14 लाभार्थ्यांनी मशिन खरेदी केले आहेत. दिनांक 29 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयात दिलेल्या अटीनुसार भाग्यवान 36 अर्जदारांना दिनांक 14 फेब्रुवारी 2019 पासून महिन्याच्या आत म्हणजेच दिनांक 13 मार्च 2019 पर्यंत मशिन खरेदी  केल्याबाबतचे दस्ताऐवजाच्या प्रति जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली या कार्यालयास सादर करण्यात यावे. सदरील 36 अर्जदारांपैकी एक महिन्याच्या आत मशिन खरेदी न केल्यास अर्जदारांची मान्यता रद्द  समजण्यात येऊन व उर्वरीत प्रतिक्षाधीन यादीतील लाभार्थ्यांना अनुक्रमानुसार संधी देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांनी केले  आहे.
000000



No comments: