05 August, 2022

 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू

 

            हिंगोली (जिमाका), दि. 05 : शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र व कृषि तंत्रज्ञान या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी-2022 ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने हिंगोली  जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 02 ऑगस्ट, 2022 ते 25 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये शासकीय तंत्रनिकेतन, औंढा नागनाथ रोड, हिंगोली या ठिकाणी दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षा केंद्र परिसरात दि. 2 ऑगस्ट, 2022 ते दि. 25 ऑगस्ट, 2022 या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर सकाळी 6.00 ते सांय. 6.00 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

No comments: