पोकरा प्रकल्पातील
फळबाग व वृक्ष लागवड करु इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवानी
सप्टेंबर पूर्वी
पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत
हिंगोली,
(जिमाका) दि. 03 : जागतिक बँक व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नानाजी
देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राज्यामध्ये सन 2018 ते जून, 2024 पर्यंत राबविण्यास
मान्यता मिळालेली आहे. या प्रकल्पामध्ये फळबाग व वृक्ष लागवड ही बाब अंतर्भूत असून
त्यासाठी 100 टक्के अनुदान उपलब्ध आहे.
या
प्रकल्पास पूर्ण होण्यासाठी केवळ दोन वर्षाचा कालावधी शिल्लक असल्यामुळे प्रकल्प
संचालक, पोकरा, मुंबई यांनी प्रकल्पांतर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये फळबाग व
वृक्ष लागवड या बाबीसाठीचे अर्ज सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याबाबत दि. 30
जून, 2022 च्या पत्रान्वये कळविले आहे.
त्यामुळे
पोकरा प्रकल्पातील फळबाग व वृक्ष लागवड करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकरी बांधवानी
सप्टेंबर, 2022 पूर्वी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषि विभागातर्फे
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment