शेतकरी उत्पादक कंपनीनी गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि.19 : विविध केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राष्ट्रीय
अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत सन 2022-23
या योजनेअंतर्गत 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम या बाबीसाठी प्रत्यक्ष
खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान
अनुज्ञेय आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छूक शेतकरी उत्पादक संघ/कंपनी
यांनी अर्ज सादर करावा.
यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार
डिझाईन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाज पत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण
करणे बंधनकारक आहे. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषिमाल साठवणुकीसाठी
शेतकऱ्यांना योग्य व माफक दर आकारुन करावा. याबाबत 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर
नोटराईज्ड हमीपत्र आवश्यक आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड व बँक
खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि
अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 सप्टेंबर 2022 पूर्वी सादर करावेत. पूर्वसंमती देण्यात
आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान
शेतकरी उत्पादक कंपनी/संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग
करण्यात येईल.
या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी उत्पादक संघ/कंपनी यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या
कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,
हिंगोली यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment