जिल्हा परिषद अंतर्गत घरोघरी तिरंगा ध्वज केंद्राचे उद्घाटन
हिंगोली, (जिमाका) दि. 05 : येथील जिल्हा परिषदेमध्ये आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विशाल राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, गटविकास अधिकारी बोथीकर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दि.१३ ऑगस्ट ते दि.१५ ऑगस्ट तिरंगा ध्वज आपल्या घरावर लावावा. दि. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक उतरावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले .
****
No comments:
Post a Comment