अल्पसंख्यांक
विद्यार्थी बहुल शाळांनी पायाभूत सोयीसुविधाच्या अनुदानासाठी
31 ऑगस्ट पर्यंत
प्रस्ताव सादर करावेत
हिंगोली, (जिमाका) दि. 11 : हिंगोली जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहूल शासनमान्य खाजगी
अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी
सुविधा पुरविण्यासाठी सन 2022-23 या वर्षासाठी अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत
अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
इच्छुक शाळांनी दि. 7 ऑक्टोबर, 2015 च्या
शासन निर्णयातील विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज परिशिष्ट अ प्रमाणे शाळेचे
संपूर्ण नाव, आवश्यक कागदपत्रे टंकलिखित करुन सविस्तर प्रस्ताव जिल्हा नियोजन
समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत सादर
करावा. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले
जाणार नाहीत, असे जिल्हा नियेाजन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment