07 August, 2022

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 8 ऑगस्ट रोजीचा सुधारित हिंगोली जिल्हा दौरा

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. 8 ऑगस्ट, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सुधारित दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दि. 8 ऑगस्ट, 2022 रोजी दुपारी 2.30 वाजता नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3.15 ते 4.00 वाजता अग्रसेन चौक, नांदेड नाका, हिंगोली येथे भव्य कावड यात्रेस उपस्थिती. 4.00 ते 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे राखीव . सांय. 5.00 वाजता गांधी चौक, हिंगोली येथे शिवसेना पक्षाची जाहीर सभा. सांय. 6.30 ते 6.45 वाजता फार्म हाऊस, सावरखेडा, हिंगोली येथे राखीव. सांय. 6.45 वाजता हिंगोली येथून मोटारीने औढा नागनाथकडे प्रयाण. सांय. 7.15 वाजता औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग दर्शन व राखीव. सांय. 7.45 वाजता औंढा नागनाथ येथून बसमत मार्गे मोटारीने नांदेड विमानतळाकडे  प्रयाण .

*******

 

No comments: