02 August, 2022

 

असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्डाच्या नोंदणीसाठी

3 व 4 ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 02 : जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील जास्तीत जास्त कामगारांना ई-श्रम पोर्टलवर जाऊन ई-श्रम कार्डची नोंदणी करुन लाभ घेता यावा, यासाठी दि. 3 व 4 ऑगस्ट, 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) वर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीस कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून नोंदणी विनामूल्य आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी 4 लाख 94 हजार 303 एवढे उद्दिष्ट दिलेले असून त्यापैकी 1 लाख 78 हजार 505 असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे. उर्वरित असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करुन शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगारांनी विशेष नोंदणी अभियानांतर्गत ई-श्रम कार्डसाठी आधार कार्ड, बँक पासबूक, आधार कार्डशी लिंक असलेला सक्रीय मोबाईल क्रमांक आदी आवश्यक कागदपत्रासह जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) वर जाऊन ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करुन लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी केले आहे.

******

No comments: