जिल्हा बाल संरक्षण कक्षाने घेतले
"आझादी का अमृत महोत्सव" निमित्ताने अनेक उपक्रम
हिंगोली, (जिमाका) दि. 17 : येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत जिल्हा
बाल संरक्षण कक्षाने "आझादी का अमृत महोत्सव" अर्थात स्वातंत्र्याचा 75
वा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जनजागृती
कार्यक्रम घेतले. यामध्ये तहसील कार्यालय हिंगोली येथे कोविड-19 मुळे विधवा
झालेल्या महिलांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच पात्र महिलांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जि.प.शाळा येहळेगाव (तुकाराम) या शाळेमध्ये "स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव" निमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बालकांना
विविध कायदे व योजनांची माहिती देण्यात आली. सेनगाव तालुक्यातील महिलांचा मेळावा जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यामध्ये सर्व महिलांना शासनाच्या
विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली.
मौजे येहळेगाव (गवळी) येथील गोकुळ विद्यालय या शाळेमध्ये अमृत
महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला व विद्याथ्यांना बालकांच्या कायद्याविषयी माहिती
देण्यात आली. वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा वारंगाफाटा ता. कळमनुरी येथे
बालकांचे हक्क व बालकांचे कायदे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 या
कायद्याची माहिती बालकांना देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सरस्वती मुलीचे
निरीक्षणगृह / बालगृह, सावरकर नगर व श्री स्वामी समर्थ बालगृह खानापूर (चित्ता)
येथील बालकांसोबत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद
स्पर्धा, खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या व बालकांना आझादी का अमृत महोत्सवाचे महत्व
सांगण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
व्ही. जी. शिंदे यांनी केले आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांचे
नियोजनानुसार जिल्ह्यात बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण
अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड.अनुराधा
पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे व रेशमा पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रबाह्य
कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत, राहुल सिरसाट यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम
घेतले. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या
अध्यक्षतेखाली दि. 17 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता नियोजन हॉल,
जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रगीताने सांगता झाली व सदर कार्यक्रम यशस्वीपणे
पार पडले.
*****
No comments:
Post a Comment