पोलीस
प्रशासनाच्या वतीने आयोजित एकता दौड रॅलीचा
जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ
* पोलीस
पथकाच्या देशभक्तीपर धूनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
* पोलीस
प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या एकता दौड रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंगोली, (जिमाका) दि. 14 : जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवांतर्गत काढण्यात आलेल्या एकता दौड रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या रॅलीच्या सुरुवातीस पोलीस
पथकाच्या देशभक्तीपर धूनने परिसरातील सर्वांच्या मनात देशभक्तीचे स्फुलिंग चेतवत सर्वांचे
लक्ष वेधून घेतले.
भारतीय
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात
स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना
कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत
हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर एकता दौडचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषेदेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर
पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय
अधिकारी उमाकांत पारधी, सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी
विवेकानंद वाखारे, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची प्रमुख उपस्थित होती .
या
एकता दौड रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ही रॅली संत नामदेव पोलीस कवायत
मैदान येथून सकाळी 7.00 वाजता निघून इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका, नरसी फाटा,
राहुली खुर्द फाटा येथे जाऊन परत संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर येवून या रॅलीचा
समारोप होणार आहे.
या
एकता रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment