जिल्हा
प्रशासनाच्या वतीने आयोजित तिरंगा सायकल राईडचा
जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ
* जिल्हाधिकारी,
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा तिरंगा सायकल राईडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग
हिंगोली,
(जिमाका) दि. 14 : जिल्हा प्रशासनाच्या
वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत काढण्यात आलेल्या 75
कि.मी. तिरंगा सायकल राईडचे उद्घाटन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या तिरंगा
सायकल राईडमध्ये स्वत: जिल्हाधिकारी श्री. पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने यांनी उत्सफूर्तपणे सहभाग
घेतल्यामुळे उत्साहाचे वातारण तयार झाले होते.
भारतीय
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात
स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना
कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत
हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील संत
नामदेव पोलीस कवायत मैदानावर 75 कि.मी. तिरंगा सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषेदेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर पोलीस अधीक्षक
यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी
उमाकांत पारधी, सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी
विवेकानंद वाखारे, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची प्रमुख उपस्थित होती .
यावेळी
जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत
असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य
लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणाची आहुती दिली. त्याचा आदर व्यक्त करण्यासाठी 75
कि.मी. तिरंगा राईडचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच या सायकल
राईडमध्ये विविध जिल्ह्यातून सहभागी झालेल्या सर्व सायकल राईडना शुभेच्छा दिल्या.
ही
तिरंगा सायकल राईड संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथून सकाळी 7.00 वाजता निघून सेनगाव,
कोळसा, सेनगाव, हिंगोली येथे येऊन येथील महावीर भवन येथे विभाजन विभीषिका
दिनानिमित्तआयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी या तिरंगा सायकल राईडचा समारोप
होणार आहे.
यावेळी
सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपस्थित
मान्यवराचे तिलक लावून औक्षण केले. तिरंगा
सायकल राईडच्या सुरुवातीस पोलीस पथकाच्या देशभक्तीपर धूनने परिसरातील सर्वांच्या मनात
देशभक्तीचे स्फुलिंग चेतवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या
तिरंगा सायकल राईडच्या उद्घाटन प्रसंगी अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment