आजादी
का अमृत महोत्सव अंतर्गत
नेहरु
युवा केंद्राच्या वतीने जिल्ह्यात स्वच्छता पंधरवाडा मोहिमेचे आयोजन
हिंगोली, (जिमाका) दि. 12 : येथील
नेहरु युवा केंद्र व भारत सरकाच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय द्वारा आयोजित
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून
महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ व समृध्द भारत ही संकल्पना राबविण्यात
येत आहे.
जिल्हा
युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात,
गावात दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान
स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे.
या
कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेची शपथ, स्वच्छता मोहिम, स्वच्छतेविषयी
जनजागृती, स्वच्छतेचे महत्व तसेच वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करुन
विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. गावातील व शहरातील शाळेचे प्राचार्य,
मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच, युवा, युवती, विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक आदी
उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नेहरु युवा केंद्राच्या तालुका समन्वयकानी
केले आहे, असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment