07 November, 2025

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 14 नोव्हेंबर रोजी आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 07 : युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकाच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने करण्यात येते. राज्यातील या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये दि. 14 नोव्हेंबर, 2025 रोजी सकाळी 9 वाजता पासून करण्यात येणार आहे. युवा महोत्सव सांस्कृतिक व नवोपक्रम यावर आधारित स्पर्धा सांस्कृतिक (समूह लोकनृत्य, लोकगीत), कौशल्य विकास (कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, कविता), भारत चॅलेंज ट्रॅक (15 ते 29 वयोगटातील युवकांसाठी केलेले सामाजिक कार्य) इत्यादी स्पर्धांचे आयोजन केंद्र शासनाने निश्चित केलेल्या नियम, अटी, वेळ, सहभागी संख्या इत्यादी प्रमाणे करण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर विजयी होणारे युवक-युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील युवक-युवतींना जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. यामध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना रोख बक्षीसे, प्रमाणपत्रे व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी 15 ते 29 वर्षे वयोगट राहील. दि. 12 जानेवारी, 2026 रोजी वयाची परिगणना 15 ते 29 असावी. जिल्ह्यातील महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवांना या युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी पात्रता राहील. प्रथम नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणीचा अंतिम दिनांक 13 नोव्हेंबर 2025 राहील. नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज संपूर्ण माहिती भरुन फोटोसह पीडीएफमध्ये स्कॅन करावे व yuvamohotsavdsohingoli@gmail.com ई-मेलवर दिनांक 13 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर (8669168483) यांच्याशी संपर्क साधावा. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या युवा महोत्सवामध्ये सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. ***

No comments: