04 November, 2025

शिक्षक पात्रता परीक्षेचे 23 नोव्हेंबर रोजी आयोजन

• हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांना सोलापूरमध्ये केंद्र उपलब्ध • कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमातील उमेदवारांना इतर जिल्ह्यात परीक्षा केंद्र उपलब्ध हिंगोली (जिमाका), दि. 04 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2025 परीक्षेचे आयोजन रविवार, दि. 23 नोव्हेंबर, 2025 रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी माध्यमांच्या विद्यार्थी, उमेदवारांची राज्यामध्ये संख्या कमी प्रमाणात असल्याने संबंधित सर्व विद्यार्थी, उमेदवारांना परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमातील उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या परीक्षा केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कन्नड माध्यमातील हिंगोली, लातूर, धाराशीव,पुणे, सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांना सोलापूर येथे केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. बंगाली माध्यमाच्या परीक्षेसाठी मुंबई पश्चिम, मुंबई उत्तर, पालघर, पुणे, धुळे, नंदुरबार व जालना जिल्ह्यातील उमेदवारांना पुणे जिल्ह्यात परीक्षा केंद्र आणि नागपूर, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना चंद्रपूर जिल्ह्यात परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कन्नड माध्यमासाठी मुंबई दक्षिण, मुंबई पश्चिम, मुंबई उत्तर, ठाणे, नाशिक व धुळे जिल्ह्यातील उमेदवारांना ठाणे जिल्ह्यात तर कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील उमेवारांना सांगली येथे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. तेलगू माध्यमासाठी मुंबई दक्षिण, मुंबई पश्चिम, ठाणे, पुणे, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर व नांदेड जिल्ह्यातील उमेदवारांना पुणे येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुजरातील माध्यमासाठी मुंबई दक्षिण, मुंबई पश्चिम, मुंबई उत्तर, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना ठाणे परीक्षा केंद्र तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवारांना नंदूरबार येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याची सर्व विद्यार्थी, उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. *******

No comments: