08 November, 2025
धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध
हिंगोली (जिमाका), दि. 08 : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 4 नोव्हेंबर, 2025 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
त्यामुळे जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 3 डिसेंबर, 2025 पर्यंत निर्बंध घातल्याचे आदेश दिले आहेत.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment