08 November, 2025

मोटार गाड्या, वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 08 : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 4 नोव्हेंबर, 2025 पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी तीन पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दि. 3 डिसेंबर, 2025 पर्यंत निर्बंध घातल्याचे आदेश दिले आहेत. ******

No comments: