04 November, 2025
निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करावा
हिंगोली, (जिमाका) दि. 04 : महाराष्ट्र कोषागार नियम-1968 नियम क्र. 335 नुसार निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी दरवर्षी दि. 01 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. हयातीचा दाखला संबंधित निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक ते ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात त्या बँकेमार्फत जिल्हा कोषागारात सादर केला जातो. तसेच राज्य शासनाच्या धोरणानुसार अधिकाधिक निवृत्तीवेतन , कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना जीवनप्रमाण प्रणालीमार्फत डिजिटल लाईफ सर्टीफिकेट देण्यात यावे. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देताना निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी बँक खाते, पीपीओ क्रमांक व सँक्शनींग ऑथरिटी-स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा, डिसबर्सींग ऑथारिटी-महाराष्ट्रा स्टेट ट्रेझरीमध्ये हिंगोली या कोषागाराचे नाव अचूक निवडावे.
सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधितांच्या बँकेशी सर्पक साधावा, असे आवाहन कोषागार अधिकारी हिंगोली यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment